आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket Fixing News In Marathi, Brendon McCullum, Chennai

फिक्सिंगची चौकशी पूर्ण; लवकरच निकाल जाहीर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- न्यूझीलंडचा बी. मॅक्युलमने निकाल निश्चितीसंदर्भात दिलेली साक्ष प्रसिद्धिमाध्यमांपर्यंत पोहोचल्यामुळे हवालदिल झालेल्या आयसीसीने त्या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून निष्कर्ष जाहीर करू, असे स्पष्ट केले आहे. मॅक्युलमने साक्षीदरम्यान 2008 च्या सुमारास एका खेळाडूमार्फत बुकींनी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते. तो खेळाडू म्हणजे दुसरा-तिसरा कुणीही नसून, क्रिस केर्न्‍स असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. मात्र आयसीसीच्या अँँटिकरप्शन युनिटला यासंदर्भात दिलेली साक्ष प्रसिद्धिमाध्यमांपर्यंत कशी पोहोचली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

2008 मध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूमार्फत बुकींनी आपल्याशी निकाल निश्चितीच्या संदर्भात संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट मॅक्युलमने केला होता. त्या खेळाडूचे मनसुबे यशस्वी ठरले नव्हते, असेही मॅक्युलमने आपल्या साक्षीत म्हटले होते. मॅक्युलमशी संपर्क साधणारा खेळाडू क्रिस केर्न्‍स असल्याची जाहीर चर्चा होत असली तरीही दस्तुरखुद्द क्रिस केर्न्‍स याने अशा आरोपांचा इन्कार केला आहे. वेलिंग्टन येथून आलेल्या वृत्तानुसार क्रिस केर्न्‍स लंडनला आज रवाना होत असून, तेथे तो स्थानिक पोलिस आणि आयसीसीच्या अँँटिकरप्शन समिती अधिकार्‍यांनाही भेटणार आहे.

बी. मॅक्युलम चौकशी पूर्ण : रिचर्डसन
आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी यासंदर्भात ‘रेडिओ स्पोर्ट्स’ला माहिती देताना सांगितले, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत आली असून, क्रिस क्रेर्न्‍स यालाही स्वत:चे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. चौकशी प्रगतिपथावर असून, अशा प्रकरणांमध्ये कायदा व सुव्यवस्था करणार्‍या संस्थांचादेखील संबंध येतो, त्यामुळे विलंब होतो.