आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी कसाेटी : इंग्लंडची विंडीजवर मात, अँडरसनच्या तीन विकेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंट जाॅर्ज - इंग्लंडसंघाने दुसऱ्या कसाेटीत वेस्ट इंंडीजवर गड्यांनी धडाकेबाज विजयाची नाेंद केली. यासह इंग्लंडने तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. यापूर्वी दाेन्ही संघाची मालिकेतील पहिली कसाेटी ड्राॅ झाली हाेती. अाता मालिकेतील तिसऱ्या कसाेटीला शुक्रवारी बार्बाडाेस येथे सुरुवात हाेणार अाहे.

जेम्स अँडरसनने पाचव्या दिवशी केलेल्या (३ बळी, १६ धावा) शानदार गाेलंदाजीपाठाेपाठ कर्णधार कुक (नाबाद ५९) गॅरी बॅलेन्सच्या (नाबाद ८१) अभेद्य १४२ धावांच्या भागीदारीच्या बळावर इंग्लंडने विजय संपादन केला. अँडरसनने अाठ षटकांत अवघ्या १६ धावा देत तीन विकेट घेतल्या. तसेच त्याने दाेन झेलही घेतल्या. त्यामुळे विंडीजला ३०७ धावांत राेखता अाले. त्यानंतर १४३ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने एक गडी गमावून सामना जिंकला.

विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसाेटीतील विजयानंतर तंबूत परतताना इंग्लंडचा कर्णधार कुक गॅरी बॅलेन्स.

बॅलेन्सच्या वेगवान १००० धावा
इंग्लंडच्यागॅरी बॅलेन्सने कसाेटीत वेगवान १००० धावांचा यशस्वीपणे पल्ला गाठला. त्याने विंडीजविरुद्ध कसाेटीतील दुसऱ्या डावात नाबाद ८१ धावा काढल्या. यासह सर्वात वेगवान एक हजार धावा पूर्ण करणारा बॅलेन्स हा इंग्लंडचा तिसरा फलंदाज ठरला. त्याने १७ कसाेट्यांतून हे यश संपादन केले.