आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजिंक्य रहाणेच्या मदतीला आले आमरे सर धावून...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सध्या भारताचे माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांचे नाव क्रिकेटपटूंचा सल्लागार म्हणून गाजतेय. अजिंक्य रहाणे, सुरेश रैना प्रवीण आमरे यांच्याकडून "टिप्स' घेऊन इंग्लंड दौऱ्यावर गेले आणि यशस्वी ठरले. अजिंक्य रहाणेची गाडी एकदविसीय क्रिकेटमध्ये ४०-४५ धावांवर येऊन अडकत होती. आमरे यांना दोन दविसांपूर्वी तीच कैफियत सांगण्यासाठी अजिंक्यचा फोन आला.
"तुझा खेळ सध्या व्यवस्थति आहे. बॅट योग्य तेवढीच खाली येत आहे. फुटवर्क चांगले आहे. पोझिशनही चुकत नाही. समस्या फक्त बॅटवरील "इम्पॅक्ट पॉइंट'ची आहे. तो इम्पॅक्ट पॉइंट अॅडजेस्ट केला की सारे काही ठीक होईल. तो पॉइंट लांब होत आहे, तो जवळ आण. तुझे तंत्र उत्तम आहे. समस्या फक्त मानसकि आहे. ४० धावांवर आलास की त्यासाठी स्वत:ला "पुश' कर. त्यानंतर शतकाचे लक्ष्य नजरेसमोर ठेव. कसोटी मालिकेत उत्तम खेळूनही एकही सामनावीर कतिाब मिळाला नाही. वनडेत त्या कतिाबासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर,' असा सल्ला आमरे यांनी दिला.

प्रवीण आमरे यांचा सल्ला अजिंक्यने तत्काळ मानला. कसोटी मालिकेत तो फिरकी गोलंदाजांना विकेट देत होता. बॅटवरील इम्पॅक्ट पॉइंट जवळ आणण्याचा सल्ला अजिंक्यच्या कामी आला. त्याने मोइन अलीची गोलंदाजी फोडून काढली. चाळिशीत आल्यानंतर "वेटिंग गेम' खेळण्याची सूचनाही उपयोगी पडली. आमरेकडे मार्गदर्शन घेण्यासाठी रहाणे, रैनापाठोपाठ उथप्पा, दिनेश कार्तिक, साहा, उन्मुक्त चंद हेदेखील आले आहेत.
आमरेंचा सल्ला
विश्वचषक २०१५ जवळ आला आहे. त्या स्पर्धेची पूर्वतयारी सुरू आहे. तेव्हा ४०-५० धावांनी काम भागणार नाही. शतकच हवे आहे. तीन आकडी धावसंख्याच लक्षात राहते, असा सल्ला आमरे यांनी दिला.