Home | Sports | Latest News | cricket, lords

‘लॉर्ड्स’वरची कसोटी 2 हजारावी मानायची का?

विनायक दळवी | Update - Jul 18, 2011, 06:49 AM IST

लग्नपत्रिका वाटल्या गेल्या. आमंत्रणे धाडण्यात आली. करवल्या सजल्या. पाहुणे मंडळी लग्नाला आली आणि अचानक सर्वांना कळले आपल्याला जायचंय त्या लग्नाचा हा मांडव नव्हे. नवरा-नवरीदेखील वेगळी. अशीच काहीशी परिस्थिती आयसीसीच्या दोन हजाराव्या क्रिकेट

  • cricket, lords

    थेट लंडनहून: लग्नपत्रिका वाटल्या गेल्या. आमंत्रणे धाडण्यात आली. करवल्या सजल्या. पाहुणे मंडळी लग्नाला आली आणि अचानक सर्वांना कळले आपल्याला जायचंय त्या लग्नाचा हा मांडव नव्हे. नवरा-नवरीदेखील वेगळी. अशीच काहीशी परिस्थिती आयसीसीच्या दोन हजाराव्या क्रिकेट कसोटीसाठी आलेल्या पाहुण्यांची झाली आहे.

    लॉर्ड्स मैदान दोन हजारावा कसोटी सामना आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. जगभरातील आयसीसीचे सदस्य लंडनमध्ये दाखल होत आहेत. सेंट्रल लंडनमधील हॉटेल क्राऊन प्लाझा पाहुण्यांनी गजबजले आहे. पण आज अचानक कसोटी सामन्यांची गणती चुकल्याचा साक्षात्कार क्रिकेटमधील आकडेशास्त्रज्ञांना झाला आहे. कारण या कसोटी सामन्यांच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि शेष विश्व यांच्यात २००५ मध्ये झालेल्या एका करमणूकप्रधान कसोटी सामन्याची मोजदाद करण्यात आली आहे. हा कसोटी सामना मुळातच दोन देशांमधला नव्हता. त्यामुळे त्याला अधिकृत कसोटी सामन्याचा दर्जा नाही.

    असं कळतं की, ‘लॉर्ड्स’ला ब्रिटिशांच्या हृदयात आगळेवेगळे स्थान आहे. त्यामुळे दोन हजारावा कसोटी सामना क्रिकेटच्या मक्केतच म्हणजे लॉर्ड्सवर ओढून ताणून आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. याचाच अर्थ भारत आणि इंग्लंड यांच्यातील ट्रेंट ब्रिज येथे होणारी दुसरी कसोटी ही दोन हजारावी कसोटी असेल? तसे झाल्यास आयसीसीचा पाहुणचाराचा खर्च वाया जाणार आहे. मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्सवरील कसोटी शंभरावी कसोटी निश्चितच असेल.
    follow us on [email protected] DivyamarathiwebTrending