आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या जोरदार फटक्याने फूटली काच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला २२ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत विजय मिळविण्याच्या उद्देशाने टीम इंडियाने शनिवारी कसून सराव केला. या सरावादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ज्या पद्धतीने खेळत होता, तेव्हा त्याचा खेळ पाहात रहावा असाच होता. हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर त्याने दमदार शॉट्स मारले.

१५ नव्या गोलंदाजांचे चेंडू तर तो लिलया सीमापार करीत होता. त्याच्या एका शॉटने तर पॅव्हेलयनमधील एका खिडकीची काच देखील फूटली. यावेळी मैदानात वीरेंद्र सेहवागदेखील होता. सरावासाठी उपस्थित वीरुच्या डोळ्यांवर यावेळी चष्मा होता. त्याचा हा नवा लूक सर्वांनाच आश्चर्यचकित करीत होता.