नवी दिल्ली- जागतिक क्रिकेटच्या नाड्या हाती घेणार्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर ऑलिम्पिक सुवर्णविजेत्या
अभिनव बिंद्राने स्तुतिसुमने उधळली आहे. बीसीसीआयकडून इतर संघटनांनीही जरा शिकले पाहिजे, असे डोस त्याने पाजले. नवी दिल्लीत एक सेमिनारप्रसंगी तो बोलत होता. जागतिक स्तरावर व्यावसायिक वातावरणनिर्मिती करणार्या मंडळाचे त्याने कौतुक केले.बीसीसीआयचे सहसचिव अनुराग ठाकूरही याप्रसंगी उपस्थित होते. बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाला 50 कोटी दिले. मात्र त्याचा योग्य वापर झाला नाही, अशी टीका त्यांनी केली. नुकतेच अभिनव बिंद्राने हॉलंडचा हेग येथील नेमबाजी स्पर्धेत तीन सुवर्णपदकावर नाव कोरले.