आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cricket News In Marathi, Cheteshwar Pujara, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेतेश्वर पुजाराचे नाबाद अर्धशतक; डर्बिशायर विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारताचा युवा खेळाडू चेतेश्वर पुजाराच्या नाबाद (९०) अर्धशतकाच्या बळावर डर्बिशायरने डिव्हिजन टू काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये शानदार विजय संपादन केला. त्याने झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन करून पदार्पणातच संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या संघाने आठ गड्यांनी सरेविरुद्धचा सामना जिंकला.

विजयाचा शिल्पकार ठरलेल्या पुजाराने बिली गोल्डनमॅनसोबत १५४ धावांची भागीदारी केली. बिलीने या वेळी संघाच्या विजयात नाबाद १०४ धावांचे याेगदान दिले. पुजाराने १०५ चेंडूंत १४ चौकारांच्या आधारे नाबाद ९० धावा काढल्या.

वरुण अॅराेनची निराशा : डरहॅमचे प्रतिनिधित्व करत असलेल्या अॅराेनने नाॅर्थनम्पटनशायरविरुद्ध निराशाजनक गाेलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात सहा षटकांत २४ धावा व दुस-या डावात तीन धावा दिल्या.