आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket News In Marathi, In 2016 India Will Play With Bangaladesh

बांगलादेशच्या 2016 मधील भारत दौर्‍यावर शिक्कामोर्तब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- बांगलादेश संघ येत्या 2016 मध्ये प्रथमच भारताचा दौरा करणार आहे. नुकताच हा दौरा निश्चित करण्यात आला. याशिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत (बीसीसीआय) सदस्य सहभाग करारावर (एमपीए) स्वाक्षरीदेखील घेण्यात आली. या करारानुसार आता 2020 पर्यंत दोन्ही देशांमध्ये मालिकांचे आयोजन करण्यात येईल. या वृत्ताला बांगलादेश क्रिकेट बोर्डचे (बीसीबी) अध्यक्ष नजमुल हसन यांनी दुजोरा दिला.
आगामी जूनमध्ये भारतीय संघ बांगलादेश दौर्‍यावर जाण्याची शक्यता आहे. याशिवाय भारताचा जून 2015 मध्ये कसोटी आणि वन डे मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा निश्चित आहे. त्यानंतर बांगलादेश 2016 मध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका खेळण्यासाठी भारताचा दौरा करेल. यादरम्यान, बांगलादेशात आयोजित टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होईल. नव्या करारानुसार आता भारत 2020 मध्ये कसोटी आणि वनडे मालिकेसाठी पुन्हा बांगलादेशचा दौरा करणार आहे.
ऑस्ट्रेलियासोबतही करार
बीसीबीने भारताशिवाय ऑस्ट्रेलियासोबतही भविष्यातील दौर्‍याचे वेळापत्रक निश्चित केले. जुलै 2018 मध्ये बांगलादेश टीम कसोटी आणि वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाईल. करारानुसार ऑस्ट्रेलिया संघ 2021 मध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे. सीएने अद्याप करारावर स्वाक्षरी केली नाही.