आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवाचा वचपा काढण्यासाठी वर्षभराची प्रतीक्षा, २०१५ मध्ये इंग्लंडचा भारत दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंग्लंडकडूनिमळालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या दृष्टिकोनातून टीम इंडियासाठी संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नात बीसीसीआय आहे. आयोजन समितीने पुढील वर्षअखेरीस (२०१५ नोव्हेंबर डिसेंबर) इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्याचा प्रस्ताव नियोजित केला आहे. त्याआधी किंवा त्यानंतर कसोटी क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षणिआफ्रिका संघालाही दौऱ्यासाठी निमंत्रण पाठवले जाणार आहे.

२०१४ हे वर्ष टीम इंडियासाेबतच बीसीसीआयसाठीही देशात मालिका झाल्यामुळे आर्थिक बाबतीत नुकसानकारक ठरले आहे. बीसीसीआयने गतवर्षाप्रमाणे यंदाही वेस्ट इंडीज संघांचा दौरा फावल्या अवधीत, भरगच्च कार्यक्रमात घुसवला आहे. मात्र बीसीसीआयला प्रचंड पैसा देणाऱ्या मालिकांसाठी पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने केंद्रात नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर पाकिस्तान संघाला भारतात पाचारण करण्याचा प्रस्ताव संबंधित मंत्रालयाकडे पाठवला होता. अलीकडच्या घडामोडी पाहता बीसीसीआयला पाकिस्तान संघाला भारतात निमंत्रित करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता कमी दिसते. संबंधित मंत्रालयानेही याआधीच बीसीसीआयला, पाकिस्तान संघाला भारतात पाचारण करण्यायोग्य वातावरण नसल्याचे सूचित केले होते, असे कळते.
त्यामुळे बीसीसीआयने आता आपले पूर्ण लक्ष, इंग्लंड, दक्षणिआफ्रिका, ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांना भारतात खेळवण्याच्या दृष्टीने केंद्रित केले आहे. २०१५ वर्ष विश्वचषक स्पर्धेचे वर्ष आहे. त्याआधी (डिसेंबर २०१४) भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर जून ते सप्टेंबर या कालावधीत भारताच्या परदेश दौऱ्याच्या आयोजनासाठी कोणत्या देशाची नवडि करायची यावर सध्या विचार सुरू आहे. मात्र, २०१५ अखेरीस इंग्लंड संघाला भारतात पाचारण करून, फिरक्या संथ खेळपट्ट्यांवर त्यांना लोळवण्याची