आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणी चषक: कर्नाटकचा धावांचा डोंगर; शेष भारत संघ अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- पाच वेळच्या चॅम्पियन कर्नाटकने इराणी चषकात शेष भारताविरुद्ध सामन्यावर पकड घेतली. या टीमने पहिल्या डावात 606 धावांचा विशाल डोंगर रचला. यजमानांकडून स्टुअर्ट बिन्नी (112) आणि चिदंबरम गौतम (122) यांनी घरच्या मैदानावर शानदार शतकी खेळी केली. कर्नाटकने पहिल्या डावात 405 धावांची आघाडी घेताना दिवसअखेर पाहुण्या शेष भारताला अडचणीत आणले. या टीमने दिवसअखेर निराशाजनक कामगिरी करताना तीन गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 114 धावा काढल्या.
आता पाहुण्या टीमला पराभवाचे सावट दूर करण्यासाठी 291 धावांची आवश्यकता आहे. त्याच्याकडे अद्याप सात विकेट शिल्लक आहेत. शेष भारताकडून दुसर्‍या डावात केदार जाधवने 44 धावा काढल्या. सलामीवीर जीवनज्योत सिंग (7) आणि गौतम गंभीर (9) स्वस्तात बाद झाले. शेष भारताने अवघ्या 20 धावांसाठी आपले दिग्गज दोन गडी गमावले. मात्र, केदार जाधव आणि बाबा अपराजित (नाबाद 42) यांनी संघाचा डाव सावरला. तिसर्‍या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दिनेश कार्तिक 9 धावांवर खेळत आहे. पहिल्या डावात सहा विकेट घेणार्‍या कर्णधार विनयने दुसर्‍या डावात 27 धावा देत दोन गडी बाद केले. संक्षिप्त धावफलक : शेष भारत : पहिला डाव-201, दुसरा डाव-4 बाद 114 (38 षटक), कर्नाटक : पहिला डाव -सर्वबाद 606 धावा
भारत-दक्षिण आफ्रिका आज सराव सामना
अबुधाबी आयसीसीच्या 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीसाठी युवा संघांच्या सराव सामन्यांना सुरुवात झाली. बुधवारी युवा भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सराव सामना होईल. यापूर्वी पहिल्या सराव सामन्यात श्रीलंकेने गत चॅम्पियन भारताला पाच गड्यांनी पराभूत केले.