आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket News In Marathi, Ishant Out Of The Bangladesh Match

ईशांतची हकालपट्टी; युवी, रैनावर विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- बांगलादेशच्या भूमीवर खेळल्या जाणार्‍या दोन स्पर्धांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया चषक 25 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत तर वर्ल्डकप टी-20 स्पर्धा 16 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत होणार आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने ईशांत शर्माची झटपट क्रिकेटमधून हकालपट्टी केली असून एकाही संघात त्याची निवड होऊ शकली नाही. दुसरीकडे अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीचा दोन्ही संघांत समावेश करण्यात आला आहे. निवड समितीने धक्कादायक निर्णय घेताना पुजाराची आशिया चषकासाठी निवड केली.
गौतम गंभीरची निवड नाहीच : निवड समितीने पुन्हा एकदा गौतम गंभीरकडे दुर्लक्ष केले. गंभीरने देशांतर्गत क्रिकेट स्पध्रेत चांगली कामगिरी केली. मात्र, इराणी ट्रॉफीच्या दोन्ही डावांत तो अपयशी ठरला.
यामुळे रैना संघाबाहेर
सलग सुमार कामगिरीमुळे रैना संघाबाहेर झाला. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतही पहिल्या तीन वनडेनंतर त्याला संघाबाहेर करण्यात आले. त्याने 24 वनडेत रैनाने फक्त एक (झिम्बाब्वेविरुद्ध)अर्धशतक ठोकले. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत ईशांतला अखेरच्या दोन सामन्यांत नारळ देण्यात आले. त्याच्या जागी अँरोनला संधी मिळाली.
वर्ल्डकप टी-20 संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वरकुमार, मो. शमी, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, मोहित शर्मा, वरुण अँरोन.
आशिया चषकासाठी संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अंबाती रायडू, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, वरुण अँरोन, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, ईश्वर पांडे.