नवी दिल्ली- आयपीएलसाठी खेळाडूंच्या बोली प्रक्रियेची प्रतीक्षा संपत आली आहे. बुधवारी सकाळी 9.30 वाजता बंगळुरू येथे बोली प्रक्रियेला सुरुवात होईल. याचे थेट प्रक्षेपण
सोनी प्रिक्स चॅनलवर केले जाईल. बोलीत 500 पेक्षा अधिक खेळाडू सामील होतील. ही बोली प्रक्रिया प्रथमच भारतीय चलनात होणार आहे.
वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा केविन पीटरसन,ज्ॉक कॅलिस यांच्या बोलीवर सर्वांच्या नजरा असतील. या प्रक्रियेत आठ फ्रँचायझी संघ कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंवरही बोली लावतील. बोलीसाठी 219 कॅप्ड खेळाडू सामील करण्यात आले आहेत. यात 169 भारतीय आणि 50 विदेशी आहेत. तर 292 अनकॅप्ड खेळाडूंत 255 भारतीय व 37 विदेशी खेळाडू सहभागी आहेत.
सेहवाग, युवीसह 14 खेळाडूंची बोली प्रथम : या बोलीत 16 जणांना अव्वल खेळाडूंच्या यादीत सामील करण्यात आले आहे. यांची बोली सर्वात आधी लागेल. या खेळाडूंना आठ-आठच्या दोन गटांत विभागण्यात आले आहे. यात सेहवाग, युवराजसिंग, केविन पीटरसन, ज्क कॅलिस, -श्रीलंकेचा महेला जयवर्धने, ऑस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सन, मुरली विजय, डेव्हिड वॉर्नर, जॉर्ज बेली, फॉफ डू प्लेसिसचा समावेश आहे.
अनकॅप्ड खेळाडूंची प्रथमच बोली
प्रथमच अनकॅप्ड खेळाडूंचा लीगच्या बोलीसाठी समावेश करण्यात आला आहे. या वेळी सर्व संघांत खेळाडूंची संख्या कमी करून 27 करण्यात आली आहे. यात विदेशी खेळाडू जास्तीत जास्त 9 असू शकतात.