आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket News In Marathi, West Indies Versus England One Day Match

वेस्ट इंडीजला नमवून इंग्लंडची मालिकेत बरोबरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अँटिगुवा - इंग्लंडने दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा 3 गड्यांनी पराभव केला. या शानदार विजयासह इंग्लंडने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. यापूर्वी सलामी सामन्यात विंडीजने इंग्लंडवर मात केली होती. आता मालिकेतील निर्णायक तिसरा सामना बुधवारी होणार आहे.


रवी बोपारा (38) आणि कर्णधार स्टुअर्ट ब्रॉड (28) यांच्या अभेद्य अर्धशतकी भागीदारीच्या बळावर इंग्लंडने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 159 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 44.5 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 163 धावा काढल्या.


धावांचा पाठलाग करणा-या इंग्लंडला सलामीवीर मायकेल लम्ब (39) आणि एम. अलीने (10) चांगली सुरुवात करून दिली. मात्र, रामपालने अलीला झेलबाद केले. त्यापाठोपाठ सुनील नरेनने राइटला भोपळा फोडू न देता आल्या पावलीच तंबूत पाठवले. ज्यो रुटने 23 धावांचे योगदान दिले. दरम्यान, स्टोक (4) आणि बटलरला (0) अनुक्रमे मिलर आणि ब्राव्होने बाद केले.


पॅरी, ट्रेडवेलची धारदार गोलंदाजी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणा-या वेस्ट इंडीजची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर ड्ॅवेन स्मिथ (5), डॅरेन ब्राव्हो (13) आणि पॉवेल (16) आणि किर्क एडवर्ड (9) झटपट बाद झाले. या चौकडीला रूट, अली आणि ब्रॉडने तंबूत पाठवले.


सिमन्सचे अर्धशतक व्यर्थ
संकटात सापडलेल्या संघाचा डाव सिमन्सने सावरला. यात त्याने शानदार 70 धावांची खेळी केली. मात्र, पराभवामुळे त्याचे अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याने 98 चेंडूंचा सामना करताना चार चौकार आणि दोन षटकारांसह 70 धावा काढल्या. मात्र, त्याला पॅरीने झेलबाद केले.


संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज : सर्वबाद 159, इंग्लंड : 7 बाद 163