आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket Series Will Be Interesting Between Two Teams Mahindrasingh Dhoni

दोन अव्वल संघांतील मालिका चुरशीची होणार - महेंद्रसिंग धोनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत अव्वल स्थानावर आहे, तर कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका. दोन्ही ठिकाणी दुसर्‍या क्रमांकावरही संघांची अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे जागतिक क्रिकेटमधील या दोन अव्वल संघांमधील आगामी मालिका अत्यंत चुरशीची, रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक अशी होईल, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्रसिंग धोनीने दौर्‍यावर रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना केले.
दौरा आयर्लंडचा असो किंवा दक्षिण आफ्रिकेचा, प्रत्येक दौरा खडतरच असा असतो. कारण स्थानिक संघाला तेथील खेळपट्टय़ा, हवामान व अन्य परिस्थितीचे अचूक ज्ञान असते, असे धोनी म्हणाला.
सचिनच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोण
सचिन तेंडुलकरच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, या प्रश्नाचे उत्तर देताना धोनी म्हणाला, आम्ही 1, 2, 3, 5, 6 असे क्रमांक पाडणार आहोत. त्यातील गमतीचा भाग सोडा, कोणत्याही खेळाडूची जागा दुसरा खेळाडू घेऊ शकत नाही. त्या स्थानावर खेळण्याची संधी आम्ही खेळाडूंना देऊ शकतो. तेथे विराट खेळेल का रोहित खेळेल हे परिस्थितीनुसार ठरवले जाईल. मात्र त्या क्रमांकावर खेळणार्‍या खेळाडूवर आम्हाला दडपण आणायचे नाही. शेवटी क्रमांकापेक्षा ज्या क्रमांकावर खेळून खेळाडू संघाला उपयोगी ठरतील अशा धावा काढू शकतो तो क्रमांक महत्त्वाचा असतो. मागील कसोटी सामन्यात रोहितने सहाव्या क्रमांकावर येऊन संघाला विजयाच्या दिशेने नेले होते.
* या वेळी एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. त्यामुळे फलंदाजांना प्रतिस्पर्धी गोलंदाज, खेळपट्टय़ा आणि हवामान आजमावता येईल.
* भारतीय संघात नवोदित खेळाडूंचा भरणा आहे. मात्र त्यामुळे प्रत्येक खेळाडूला आपली उपयुक्तता, गुणवत्ता सिद्ध करण्याचे ही एक संधी आहे.
* आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षात होणारा खेळ महत्त्वाचा असेल. आम्ही कोणत्या परिस्थितीत कामगिरी केली, होती हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.
* ईशांतसारख्या गोलंदाजाला कसे नियंत्रणाखाली ठेवणार या प्रश्नाचे उत्तर धोनीने किंचित हसून व विचार करून दिले, तो म्हणाला, ‘ती माझी गुप्त योजना आहे. कुणाला कळू द्यायची नाही.’