मेलबर्न : क्रिकेटचा 'महासंग्राम' अर्थात 'विश्वचषक' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विश्वचषकाची सुरुवात भन्नाट होण्यासाठी आयोजकांनी उद्घाटन समारंभाला मेलबर्न सिम्फनी ऑर्केस्ट्राचे आयोजन केले आहे.
उद्घाटन समारंभ 12 फेब्रुवारीला असून या समारंभास अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार असल्याचे व्हिक्टोरियाचे पर्यटनमंत्री जॉन एरेन यांनी सांगितले.
‘‘आयसीसी क्रिकेट विश्वचषक २३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात होत असून मेलबर्नमध्ये त्याचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी संपूर्ण ऑस्ट्रेलिया सज्ज झाले असल्याचेही जॉन एरेन सांनी म्हटले.
पुढील स्लाइडवर वाचा, न्यूझीलंडमध्येही रंगणार सोहळा...