आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket World Cup: Michael Clarke Cant Play Against England

अॉस्‍ट्रेलियाला धक्‍का; इंग्‍लंडविरुध्‍द नाही खेळणार कर्णधार मायकल क्‍लार्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - विश्वचषक सामन्‍यातील अॉस्‍ट्रेलिया विरुध्‍द इंग्‍लंड या पहिल्‍याच सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याला खेळता येणार नाही. दुखापतीतून अद्याप न सावरल्‍याने तो पहिल्‍या सामन्‍यात खेळू शकणार नाही.
क्लार्क दुखापतीतून सावरत असला, तरी तो पहिल्या सामन्यात खेळणार नाही. तो बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात नक्की खेळेल, अशी आशा असल्‍याचे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरीन लेहमन यांनी सांगितले. लेहमन मेलबर्न क्रिकेट मैदानावर पत्रकारांशी बोलत होते.
भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान क्‍लार्कच्‍या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही महिने क्रिकेटपासून दूर होता. त्याने बुधवारी यूएई संघाविरुद्ध सराव सामना खेळला होता. अर्धशतकही झळकाविले होते. पण, आता तो विश्‍वचषकातील ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, विश्‍वचषकाचे वेळापत्रक..