ब्रीजटाऊन - क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला दिग्गज खेळाडू ब्रायन लारा चर्चेत आला आहे. नाही... नाही... तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार नाही, तर एका स्थानिक कार्यक्रमात त्याने सर्वसामान्यांमध्ये मिसळून बेभान होऊन नृत्य केले आहे. लारा कॅरिबियन देशातील बार्बाडोस येथील शेतातील पीक काढल्यानंतर साजरा केल्या जाणार्या उत्सवात सहभागी झाला. 'काडोमेंट परेड'असे नाव असलेल्या या उत्सवात स्थानिक लोक बेभान होऊन नाचतात. यावेळी लारा त्याचा मित्र आणि मॅनचेस्टर युनायटेडचा माजी स्ट्रायकर ड्वाएट यॉर्कसह आला होता.
काय आहे काडोमेंट परडे?
बार्बाडोसमध्ये पीक काढणीनंतर काडोमेंट परेडचे आयोजन केले जाते. या उत्सवाची सुरवात 1699 मध्ये करण्यात आली. या दिवशी बार्बाडोसमध्ये सार्वजनिक सुटी असते. त्या दिवशी शहरातील रस्त्यांवर ब्राझीलमधील परेड सारखे दृश्य असते. काडोमेंट परडेमध्ये लाराने स्थानिक महिला डान्सरसह ठुमके लगावले आणि तो देखील उत्सवाच्या रंगात रंगून गेला होता.
पुढील स्लाइडमध्ये, ब्रायन लारा आणि त्याचा मित्र ड्वाएट यॉर्कची मस्ती