आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Greg Chappell Birthday News In Marathi

B'DAY: चॅपेलमुळे विस्‍कटली होती भारतीय क्रिकेटची घडी, सचिन घेणार होता निवृत्‍ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइलफोटो - सचिन तेंडुलकर आणि ग्रेग चॅपेल)
ऑस्‍ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल आज (गुरुवार) आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेट चाहत्‍यांमध्‍ये चॅपेलची प्रतिमा एखाद्या व्हिलनप्रमाणे आहे. चॅपेलमुळे भारतीय क्रिकेट संघामध्‍ये चांगलेच वाद माजले होते. एवढेच काय मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्‍ती घ्‍यायला तयार झाला होता.

निवृत्‍तीसाठी घेणार होता सचिन
चॅपेलने आपल्‍या आत्‍मचरित्रामध्‍ये राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, जहीर खानसह अन्‍य वरीष्‍ट खेळाडूंवर टीकात्‍मक लिहिले होते. चॅपेलने सचिनची एवढी प्रताडणा केली होती की, सचिन क्रिकेटमधून निवृत्‍ती घ्‍यायला तयार झाला होता. असे सचिनची पत्‍नी अंजलीने 2011 च्‍या विश्‍वचषक जिंकल्‍यानंतर प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली होती.
पुढील स्‍लाइडवर वाचा, चॅपेल आणि वाद