(फाइल फोटो - पत्नी सुमैया सोबत विमानतळावर आमला)
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू हाशिम आमलाने सर्वांत जलद 17 शतके लगावत
विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडित काढला. त्याने 98 डावांमध्ये 17 शतके लगावली. विराट आणि आमला दोघांच्याही स्वभावामध्ये खूप अंतर आहे. 31 वर्षिय आमला स्वभावाने लाजरा, मृदू आहे. इस्लामचे तंतोतंत पालन करणारा आहे. तर नेमके याउलट विराट आक्रमक आणि बिनधास्त आहे.
काय आहे शांत असण्याचे राज
हाशिम आमला त्याच्या परिवारामध्ये सर्वांत लहान आहे. हाशिमपेक्षा अहमद हाशिम त्याचा भाऊ चार वर्षांनी मोठा आहे. अहमद हाशिम कधी-कधी आमलाची पिटाईसुध्दा करत होता. त्यामुळे आमला बाहेरुन शांत आणि आतून मजबूत दिसतो. असे स्वत: आमलानेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.
हाशिमला लहानपासून क्रिकेटचे वेड
हाशिमचा जन्म डरबनपासून 40 किमी अंतरावर टॉन्गॉट शहरात झाला होता. हाशिमच्या वडिलांनी कधीच मुलांवर
आपले निर्णय लादले नाहीत. लहानपासून हाशिमला क्रिकेटची आवड असल्याने त्याचे घरात क्रिकेटचे लाड पुरविल्या गेले. त्याचेच फळ आज सर्वांना दिसते आहे.
बुरख्यात राहते आमलाची पत्नी
आमला इस्लामच्या नियमांचे तंतोतंत पालन करतो. त्यामुळे त्याने मोठी दाढी वाढविली आहे. दक्षिण आफ्रिका संघाला ‘कॅसल’ ही मद्य कंपनी स्पॉन्सर करते. त्यामुळे सर्व खेळाडू या कंपनीच्या लोगोचा टी-शर्ट परिधान करतात. मात्र, आमला असा टी-शर्ट वापरत नाहीत. संघ व्यवस्थापकसुध्दा त्यांच्या धार्मिक भावनांचा आदर करतात.
हाशिमची पत्नी सुमैया नेहमी बुरख्यामध्ये राहते. अन्य टीम सदस्यांच्या पत्नींप्रमाणे ती स्टेडियममध्ये सामने पाहण्यासाठी जाते, मात्र बुरखा आणि हिजाब परिधान करुनच.
पुढील स्लाइडवर वाचा, आमलाचे दोन विक्रम, जो विराट कोहली करु शकला नाही.