आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्यूजचे कुटुंब सिडनीत चौथी कसोटी पाहणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- येत्या मंगळवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. ही कसोटी पाहण्यासाठी फिलिप ह्यूजचे कुटुंब स्टेडियममध्ये दाखल होतील. याच मैदानावर बाउन्सर लागून फिलिप ह्यूजचा मृत्यू झाला. आता याच मैदानावर सुरू होणा-या कसोटीसाठी हे सर्व कुटुंबीय पाच दिवस स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी थांबतील, अशी माहिती ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने दिली. खेळाडू मैदानावर उतरताच त्यांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही, असेही तो म्हणाला. या मैदानावर ह्यूजला त्याच्या कुटुंबीयांनी धावांचा पाऊस पाडताना पाहिले आहे. मात्र, आता याच मैदानावर ह्यूज नसेल, तरीही जुळलेल्या आठवणींना उजाळा मिळेल. कुटुंबीयांचे क्रिकेटवरचे प्रेम कायम आहे, असेही तो म्हणाला.

क्लार्कचे समालोचन
भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटची व चौथी कसोटी खऱ्या अर्थाने वेगळी ठरणार आहे. या कसोटीचा आनंद लुटण्यासाठी ह्यूजचे कुटुंब येणार आहेत. तसेच याच कसोटीसाठी क्लार्क हा समालोचकाच्या भूमिकेत कॉमेन्ट्री बॉक्समध्ये असेल. ह्यूजच्या कुटुंबीयांची सिडनी स्टेडियममधील उपस्थिती म्हणजे मोठा सन्मानच आहे. त्यामुळे कॉमेन्ट्री बॉक्समध्ये फावल्या वेळेत मी या कुटुंबीयांसमेवत राहणार आहे,असेही क्लार्कने सांगितले.