(फोटो - कझाकिस्तानच्या झैनाला ठोसा लगावताना मेरी कोम)
भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमपासून प्रसिध्द गायक बप्पी लहरीला धोका उद्भवण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन सर जडेजाने केले आहे.
आपण विचारात पडला असाल की, सुरांचा बादशहा बप्पी लहरीसोबत मेरी कोमची तुलना कशी होऊ शकते ? परंतु सर रवींद्र जडेजाने ही तुलना केली आहे. मेरी कोमने करियरमध्ये 13वे सुवर्णपदक जिंकल्यासनंतर जडेजाने हे ट्वीट केले आहे.
क्रिकेटर रवींद्र जडेजा ने आपल्या टि्वटर अकांउटवर मेरी कोमला शुभेच्छा देताना अशी तुलना केली आहे.
जडेजाने केलेले ट्वीट
@SirJadeja - Gold for Mary Kom. Soon she'll defeat Bappi Lahiri in amount of gold they possess. #MaryKom
सर रवींद्र जडेजाने लिहिले की, "मेरी कोमला सुवर्ण! ती लवकरच बप्पी लहरीला सोन्याच्या स्पर्धेत पराभूत करु शकते." उल्लेखनीय म्हणजे बप्पी लहरी संपूर्ण शरीरावर सोने घालतो. शरीरावर सर्वांधीक सोने घालण्यामध्ये बप्पी लहरी प्रसिध्द आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, मेरी कोमने सुवर्ण कामगिरी केल्यानंतर दिग्गजांनी दिलेल्या प्रतिक्रिया