आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cricketer Jesse Ryder In Hospital With Serious Head Injuries After Being Involved In A Fight

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूझीलंडच्या जेसी रायडरला बारमध्ये मारहाण; कोमात गेल्याने प्रकृती गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्राईस्टचर्च- न्यूझीलंडचा क्रिकेटपटू आणि सलामीचा फलंदाज जेसी रायडरला चार हल्लेखोरांनी जबरी मारहाण केली आहे. त्यामुळे जेसीची प्रकृती नाजूक व गंभीर बनली असल्याचे सांगण्यात येते. तो सध्या कोमात असून, त्याचा जीव वाचविण्याचा डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

याबाबत वृत्तसंस्थेत आलेल्या वृत्तांत म्हटले आ हे की, रायडर बारमध्ये गेला होता. मात्र तेथे त्याचा एका चार-पाच लोकांच्या ग्रुपसोबत वाद झाला. जेसी रायडर याआधीही बारमध्ये दारु पिणे व भांडणे करणे यासाठी चर्चेत आला होता. यामुळे त्याला संघातील स्थानही अनेक वेळा गमवावे लागले होते. आताही बारमध्ये दारु पित असतानाही त्याचा एका ग्रुपशी वाद झाला. त्यात त्यांच्यात जोरदार मारहाण झाली. मात्र चौघांनी रायडरला जबरी मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी आहे. सध्या तो कोमात आहे. त्याच्या जीवाला धोका असल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याच्या डोक्यातील हाडाला गंभीर जखम झाली असून शरीरातील काही हाडे तुटली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जेसी रायडर पुढील आठवड्यात भारतात आयपीएल खेळायला येणार होता. त्याला दिल्ली डेयरडेविल्सने तीन लाख डॉलरला खरेदी केले होते. मात्र आता तो येण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगण्यात आले.