आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Kedhar Jadhav News In Marathi, Divya Marathi

केदारला पुणे जिमखान्याचे मैदान मिळेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय संघातील प्रवेशाची दारे उघडी झालेली असूनही केदार जाधवला पुण्याच्या डेक्कन जिमखाना क्लबने त्यांचे मैदान सरावासाठी उपलब्ध करून देण्यास तयारी दर्शवली नाही. त्यामुळे बांगलादेश दौर्‍यावर जाण्यापूर्वी केदारला एका खासगी क्लबच्या जागेत पैसे मोजून सराव करावा लागण्याची वेळ आली आहे.
बांगलादेश दौर्‍यावर जाण्यासाठी भारताच्या संघात केदार जाधवची निवड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याचे होम पिच असलेल्या पुण्याच्या डेक्कन जिमखान्यात त्याने सरावासाठी जागा देण्याची मागणी केल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मला 22 यार्डच्या जागेसाठी 18 हजार रुपये मासिक शुल्क भरून 22 यार्ड क्रिकेट अकॅडमीत सराव करण्याची वेळ आली असल्याचे केदारने नमूद केले.
लोगोने पडतो बराच फरक
खेळाडूच्या छातीवर भारताकडून खेळल्याचा लोगो असला की सारे काही बदलते. त्यामुळेच मी जेव्हा बांगलादेश दौर्‍यावरून देशासाठी खेळून परतेन तेव्हा खूप काही बदललेले असेल, अशी आशा केदारला आहे. आता वनडे टीममध्ये स्थान मिळवण्याचे ध्येय असल्याचे तो म्हणाला.