आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cricketer Pragyan Ojha Birthday Latest Story News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'DAY: 2012 मध्‍ये प्रज्ञान ओझाने मृत्‍यूलाच चकविले! चेंडूने झाला होता गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - पत्‍नी कराबी सोबत पज्ञान ओझा)
भारतीय क्रिकेटसंघातील फिरकीपटू प्रज्ञान ओझा आज (5 सप्‍टेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. 2012 मध्‍ये एक वेगवान चेंडू लागल्‍याने प्रज्ञान ओझा गंभीर जखमी झाला होता. त्‍या जखमीपणावर यशस्‍वी मात करुन ओझा चक्‍क मृत्‍यूलाच चकवून आला होता.
भारत विरुध्‍द श्रीलंका दरम्‍यान कोलंबो येथील प्रेमदासा स्‍टेडिअममध्‍ये ओझा सराव करत होता. सरावादरम्‍यान फलंदाजाने एक शॉट खेळला. चेंडू थेट ओझाच्‍या मानेवर लागला. शॉट एवढा जबरदस्‍त होता की, ओझा जागेवर मैदानात कोसळला. त्‍याची अवस्‍था पाहताच सर्व खेळाडू चिंतेत पडले होते.
ओझाला तात्‍काळ कोलंबोच्‍या लंका हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. त्‍यावेळी डॉक्‍टर म्‍हणाले होते की, '' चेंडूची गती थोडी शिल्‍लक असती तर ओझाला प्राण गमवावे लागले असते.''
गळ्याच्‍या उजव्‍या बाजुला 'जगलर वेन' नावाची एक शीर असते. तिच्‍यावर दाब पडल्‍यास माणसाचा मृत्‍यू होतो. त्‍यामुळे ओझाच्‍या जीविताला मोठा धोका उद्भवु शकला असता.
ओझाविषयी काही खास गोष्‍टी
* ओझाने क्रिकेटला सुरुवात शाळेपासून केली.
* ओझाला फिरकीपटू होण्‍याचे कौशल्‍य जाणले ते कोच विजय पॉलने.
*ओझाने प्रेमविवाह केला. पहिल्‍या भेटेतच आवडलेल्‍या मुलीविषयी त्‍याने त्‍याच्‍या आई वडिलांना सांगितले आणि विवाह केला.
*क्रिकेटसाठी ओझाने ओडिशा सोडून हैदराबाद गाठले होते.
* ओझाच्‍या पत्‍नीने मायक्रो बायोलॉजीमध्‍ये पीएचडी केली आहे.
*ओझाने टी-20 मध्‍ये आंतरराष्‍ट्रीय सामन्‍यात पदार्पनातच उत्‍कृष्‍ट खेळाडू पुरस्‍कार पटकाविला होता.
*भारतीय फिरकीपटूंच्‍या दिग्‍गजांमध्‍ये ओझाचा समावेश होतो. त्‍याने 20011 मध्‍ये चार सामन्‍यामध्‍ये 12.95 च्‍या सरासरीने 24 विकेट पटकाविल्‍या होत्‍या.
पुढील स्‍लाइडवर पाहा, प्रज्ञान ओझाचा फॅमिली अल्‍बम