आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Sachin Tendulkar Annoyed At Reports On Daughter Sara

साराच्या बातमीने तेंडुलकर वैतागला, ट्विट करून केले मुलीच्या बाॅलीवूड प्रवेशाचे खंडन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सारा सचिन तेंडुलकर.. लवकरच हिंदी चित्रपटात पदार्पण करणार, अशी बातमी वाचल्यानंतर जगभरातील तमाम सचिनच्या चाहत्यांना "खरंच की काय' असा प्रश्न न पडला तर नवलच! दरम्यान, या चर्चांना मास्टर ब्लास्टर पुरता वैतागला असून त्याने आपली मुलगी चित्रपटात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे साराच्या बॉलीवूड एंट्रीच्या चर्चांना तूर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे.

सारा तेंडुलकर अभिनेता शाहिद कपूरसोबत एका चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी सर्वत्र पसरली होती. त्यानंतर जो-तो एकच चर्चा करताना दिसत आहे. मात्र, सचिनने हे वृत्त निराधार असल्याचे सांगितले आहे. सचिनने जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती त्या वेळीही त्याला साराच्या बॉलीवूड प्रवेशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, सचिनने तेव्हा या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला होता.

सचिन क्रिकेटमध्ये असताना आणि निवृत्तीनंतरही त्याने आपली मुलगी सारा व अर्जुन यांना चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर ठेवले. मात्र, सारा तेंडुलकरबाबत अनेकांना खूप उत्सुकता आहे. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी तिच्या मित्राबाबतही चवीने चर्चा झाली होती. सारा सध्या १७ वर्षांची असून ती शिकत आहे. मात्र, तिचे बॉलीवूड प्रेम यापूर्वीही काही प्रमाणात दिसून आले आहे. आमिर खानने खास आयोजित केलेल्या "देल्ही बेल्ही' या चित्रपटाच्या प्रीमियरला ती आई अंजलीसोबत आवर्जून उपस्थित होती. दरम्यान, साराला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा असलेल्या अनेकांचा तूर्तास तरी भ्रमनिरास झाला आहे.
माध्यमांपासून दूर
क्रिकेट विश्वातला चमकता तारा असलेल्या सचिन तेंडुलकरचा परिवार कायम माध्यमापासून दूर असताे. पत्नी अंजली, मुलगी सारा, मुलगी अर्जुन हे फारसे कॅमेऱ्यासमाेर येणार नाहीत याची काळजी सचिनने अाजवर घेतली अाहे.
सचिनचे िट्वट
साराला शैक्षणिक क्षेत्रात रस आहे. ती सध्या शिकत असून त्यामध्ये आनंदी आहे, ती चित्रपटात काम करणार असल्याची बातमी चुकीची आहे. त्यामुळे आता तरी अशा अफवा पसरवू नयेत, अशी विनंती त्याने केली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सारा तेंडुलकरची छायाचित्रे