आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Sachin Tendulkar Win Award Latest News In Divya Marathi

सचिनच्या कारकीर्दीला चकाकती मानवंदना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या क्रिकेट कारकीर्दीचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या देदीप्यमान कारकीर्दीला मानवंदना देण्यासाठी खास चांदीचे नाणे व्हॅल्यू मार्ट गोल्ड अँड ज्वेल्स लिमिटेड या कंपनीने बाजारात आणले आहे. सचिनची छबी आणि स्वाक्षरी असलेल्या या नाण्याचे अनावरण खुद्द सचिनच्या हस्तेच करण्यात आले.
डायमंड इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने बाजारात आणण्यात आलेले हे खास नाणे ‘कलेक्टर्स एडिशन सिल्व्हर कॉइन’ म्हणून ओळखले जाते. या चांदीच्या नाण्यांच्या माध्यमातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या प्रभावशाली ऐतिहासिक अशा कारकीर्दीचा गौरव केला आहे. 200 कसोटी सामने आणि 15921 धावा या आकड्यांचा वापर करत 200 ग्रॅमच्या स्विस सिल्व्हरमधील 15921 नाण्यांच्या निíमतीच्या माध्यमातून हा गौरव करण्यात आला आहे. व्हॅल्यू मार्ट आणि डायमंड इंडियाने हाती घेतलेली ही अभिनव योजना स्तुत्य तर आहेच; पण योगायोग म्हणजे माझ्या क्रिकेट कारकीर्दीचेही हे सिल्व्हर ज्युबिली वर्ष असल्याचे सचिन तेंडुलकरने अनावरणप्रसंगी बोलताना सांगितले.
व्हॅल्यू मार्टचे व्यवस्थापकीय संचालक सी. के. वासुदेवन आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, ‘आम्ही अशा एका युगाचे साक्षीदार आहोत, ज्या युगामध्ये सचिन तेंडुलकर फक्त खेळले नाहीत, तर देशातील संपूर्ण पिढीला त्यांनी सर्वोत्तम खेळाने वेडावून टाकले. आपल्यापैकी प्रत्येकानेच सचिन यांचे काही क्षण आपल्या मनात अगदी खजिन्यासारखे जपून ठेवले आहेत. आता कलेक्टर्स एडिशन तेंडुलकर कॉइन्सच्या माध्यमातून ते सर्व आनंदाचे आणि अभिमानाचे क्षण साजरे करू शकतात.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि पहा सचीनचे आनंदी क्षण