आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Sanath Jaisurya Comment On Karnataka Issue And BCCI

श्रीलंकन खेळाडूंना बंदी घातल्याने जयसूर्या नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एकेकाळी आपल्या स्फोटक बॅटच्या तडाख्यांनी क्रिकेट विश्वाला हादरवणा-या सनथ जयसूर्याने शुक्रवारी मुंबईत आपल्या तिखट वाणीचा प्रसाद श्रीलंकन क्रिकेटपटूंवर बंदी घालणा-या तामिळनाडू सरकार आणि बीसीसीआयला दिला. खेळामध्ये राजकारण आणू नये या मताचा मी आहे, असे सांगून जयसूर्याने म्हटले, चेन्नईवासीय आम्हाला बंधू आणि भगिनींसारखे आहेत. आम्ही त्या सर्वांचे श्रीलंकेत स्वागतच करू. आम्हाला आयपीएलमध्ये चेन्नईत कशी वागणूक मिळाली याबद्दल खेदही व्यक्त करणार नाही, असेही यावेळी त्याने म्हटले.
बीसीसीआयच्या भूमिकेबाबतही जयसूर्याने आश्चर्य व्यक्त केले. आयपीएल स्पर्धेत खेळणाºया श्रीलंकेच्या खेळाडूंना, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पूर्वतयारीच्या श्रीलंकेच्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेसाठी काही काळापुरते मुक्त करावे, अशी मागणी आम्ही केली होती. बीसीसीआयने ती मागणी अमान्य केली. त्याबाबत आमची काहीही तक्रार नाही. कारण आम्ही फक्त विनंतीच करू शकतो.

जयसूर्याने आयपीएलमधील क्रिकेट पाहिल्यानंतर क्रिकेट सध्या कुठे चालले आहे, असा सवाल उपस्थित केला. आता खेळाडू मैदानात उतरतात आणि चौकार, षटकार मारायला सुरुवात करतात. कोण किती चेंडूंत शतक ठोकेल हे सांगता येणार नाही. मात्र, त्यामुळे गोलंदाजांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे गोलंदाज विकेट काढण्यासाठी गोलंदाजी करीत नाहीत. ते चेंडू फटकावला जाऊ नये या दृष्टीने बचावात्मक आणि नकारात्मक गोलंदाजी करतात. गोलंदाज चेंडूला उंची द्यायला, फिरकी द्यायला विसरले आहेत. चेंडू स्विंग करायला धजावत नाहीत. चेंडू फटकावला कसा जाणार नाही या दृष्टीनेच विचार करतात. फलंदाजाला बाद करण्याचा विचार करीत नाहीत, असेही श्रीलंकेच्या या माजी खेळाडूने नमूद केले.