(फाइल फोटो - संजू सॅमसन)
केरळचा युवा क्रिकेटपटू संजू सॅमसनने भारतीय अ संघाकडून ऑस्ट्रेलियाविरुध्द पाच एकदिवसीय सामन्यामध्ये धमाकेदार कामगिरी केली. त्यामुळेच त्याला भारतीय क्रिकेटसंघाने इंग्लंडमध्ये होत असलेल्या एकदिवस सामन्यासाठी इंग्लडमध्ये पाचारण केले आहे. जेव्हा केव्हा संजू घरी असतो, तेव्हा तो आपली स्पोर्ट्स बाईक 'कावासाकी' वरुन भटकंती करत असतो. धोनीप्रमाणेच तो बाईकचा शौकीन आहे.
ऑस्ट्रेलियाविरुध्द केल्या 244 धावा
विकेटकीपर संजू सॅमसनने ऑस्ट्रेलियाविरुध्द उत्कृष्ट प्रदर्शन करत सात सामन्यांमध्ये 244 धावा केल्या. त्याची निवड आगामी विश्वचषकावर लक्ष ठेवून केल्याचेही चर्चा आहे.
आयपीएलमध्ये खेळतो राज्यस्थानकडून
संजू सॅमसन आयपीएल-7 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. संजू सॅमसन संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, संजू सॅमसनची Lifestyle