आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Sir Don Bradman Birth Anniversary Latest News In Marathi

B\'DAY: दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांनी नॉनस्‍टॉप पाच महिने साजरा केला होता हनिमून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट जगतामध्‍ये ने‍हमी वेगवेगळ्या कारणावरून खेळाडू चर्चेत राहात असतात. क्रिकेमधील माजी खेळाडू सर डॉन ब्रॅंडमॅनचा आज 106 जन्‍मदिवस आहे. या खेळाडूने फक्‍त मैदानच गाजवले नाही तर तो आपल्‍या वयक्तिक आयुष्‍यातही नेहमी चर्चेत राहिला.
आपल्‍या कारर्किदीतील 22 टेस्‍टमॅचमध्‍ये ब्रँडमॅनने विविध विक्रम स्‍थापित केले असले तरी, नॉनस्‍टॉप पाच महिने हनिमून साजरा करण्‍याचा अगळावेगळा विक्रम या खेळाडूने स्‍थापित केल्‍यामुळे सर डॉनची चर्चा जगभर झाली.
सर डॉन नावाने ओळखल्‍या जाणा-या डॉनल्‍ड ब्रॅंडमॅन हा रोमँटीक व्‍यक्‍ती म्‍हणून ओळखला जात असे. आपला लाईफ पार्टनर कोण असले याची निवड वयाच्‍या 12 व्‍या वर्षी केली होती. या खेळाडूची प्रेमकथा भा‍रताचा माजी क्रिकेटर सौरभ गांगुलीच्‍या प्रेमकथेसारखी आहे. सर डॉन आपल्‍या शेजारी राहणा-या मुलीच्‍या प्रेमात पडला.
पहिले प्रेम- डॉन आपल्‍या शेजारी राहणा-या जेसी नावाच्‍या मुलीसोबत शाळेत जात असे. सोबतच शाळेत जात असल्‍यामुळे दोघामध्‍ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. याकाळात सर डॉनने जेसी सोबतच लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला.
पाच महिन्‍याचा हनिमून-
लग्‍न झाल्‍यानंतर सर डॉनचे क्रिकेटवरचे प्रेम मात्र कमी झाले नाही. हनिमूनच्‍या निमित्ताने पत्‍नी जेसीला सोबत घेऊन गेला. क्रिकेटसाठी ही टीम कॅनडा आणि अमेरिकेला गेली होती. या पाच महिन्‍याच्‍या काळात सर डॉन वँकूवर, बॅन्‍फ, मूस जॉ, विनिपेग, टोरंटो, शिकागो, न्‍यूर्याक, सॅन फ्रांसिस्‍को याठिकाणी सर डॉन आपल्‍या पत्‍नी सोबत हनिमून साजरा करण्‍यासाठी जाऊन आला.
पुढील स्‍लाईडवर पाहा सर डॉन ब्रँडमॅनची काही ऐतिहासीक फोटो...