आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Sir Gary Sobers 78th Birthday Facts News In Marathi

B\'DAY: या दिग्‍गज क्रिकेटपटूने लहानपणी स्‍व:ताच कापली होती स्वतःची बोटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - समुद्रकिनारी फलंदाजी करताना गॅरी सोबर्स- फाइल फोटो)
एकाच षटाकत सहा षटकार लगावणारा वेस्‍ट इंडीजचा माजी दिग्‍गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स आज 78 वा वाढदिवस साजर करत आहे. सर सोबर्स यांच्‍या दोन्‍ही हातांना सहा-सहा बोटे होती. त्‍यामुळे त्रस्‍त असलेल्‍या सोबर्सने स्‍व:ताच चाकू आणि दो-याच्‍या सहाय्याने हे अतिरिक्‍त बोटे कापली होती. जाणून घ्‍या त्‍याच्‍याविषयी काही खास माहिती.
* गॅरी सोबर्सचा जन्‍म 28 जुलै 1936 रोजी बारबडोसमध्‍ये शेमॉन्‍ट आणि थेल्‍मा यांच्‍या घरी झाला.
* सोबर्स पाच वर्षाचा असताना त्‍याचे वडील समुद्रामध्‍ये मृत्‍यू पावले होते.
* गॅरी नावाने क्रिकेटमध्‍ये प्रसिध्‍द असलेल्‍या सोबर्सला 5 भाऊ- बहिणी आहेत.
* 1966-67 मध्‍ये सोबर्स भारतीय दौ-यावर असताना त्‍यांची ओळख भारतीय अभिनेत्री अंजू महेंद्रु सोबत झाली आणि त्‍यानी लवकरच लग्‍न केले. परंतु ते जास्‍त काळ टिकले नाही.
* सप्‍टेबर 1969 मध्‍ये सोबर्सने ऑस्‍ट्रेलियाच्‍या प्रु किर्बीसोबत विवाह केला. त्‍यांना मॅथ्‍यू आणि डेयिल नावाचे अपत्‍य होते. सोबतच त्‍यांनी एका मुलाला दत्‍तक सुध्‍दा घेतले होते.
* काही काळ सोबर्सने ऑस्‍ट्रेलियाचे नागरिकत्‍व पत्‍करले.
* सोबर्सने 93 कसोटी सामन्‍यामध्‍ये 160 पारींमध्‍ये 57.78 च्‍या सरासरीने 8032 धावा बनविल्‍या आहेत. ज्‍यामध्‍ये 26 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सोबर्सची छायाचित्रे..