स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर सुरेश रैना सध्या
आपली पत्नी प्रियंका आणि मुलगी ग्रेसियासह हॉलिडे एन्जॉय करत आहे. हे कपल काही फ्रेंड्ससोबत दार्जलिंगमध्ये आहे. रैनाची पत्नी प्रथमच या अंदाजात फ्री होऊन फिरताना दिसत आहे. यापूर्वी जेव्हा ती इंडियात आली होती तेव्हा तिला मीडियाने घेरले होते. आपल्याला माहित असेलच की, रैनाची पत्नी प्रियंका नेदरलंड्समध्ये नोकरी करते.
अनेक दिवसापासून आहे भारतात....
- क्रिकेटपासून दूर असलेला रैनाने पत्नी प्रियंका आणि मुलगी ग्रेसियासोबत हॉलिडे एन्जॉय करताना दिसत आहे.
- रैनाची पत्नी दार्जलिंगमध्ये मुलीला खांद्यावर घेऊन फिरताना दिसत आहे. तिचा असा देशी अंदाज प्रथमच दिसून आला.
- रैनाची पत्नी प्रियंका मागील काही दिवसापासून इंडियात आहे.
- या जोडीचे आपल्या नातेवाईकांसह दिवाळी सेलिब्रेट करतानाचे फोटो समोर आले होते. आता हॉलिडेचे फोटोही त्यांनी सोशल मिडियात शेअर केले आहेत.
- रैना मागील वर्षभरापासून इंटरनॅशनल क्रिकेटपासून दूर आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे सीरीजसाठी संघात निवडले गेले होते.
- मात्र, त्याच दरम्यान रैना तापाने फनफनल्याने त्याला एकाही सामन्यात खेळता आले नव्हते.
- रैना ऑक्टोबर, 2015 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरोधात शेवटची वनडे मॅच खेळला होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सुरेश रैना आणि त्याच्या पत्नीचे हॉलिडे फोटोज...