आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Suresh Raina Marriage Priyanka Chaudhary Mahendi Ceremony News In Marathi

सुरेश रैनाचे आज शुभमंगल: बाउंसरच्या सुरक्षेत प्रियंकाच्या हातावर लागली मेंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: याच हॉटेलमध्ये लागली प्रियंकाच्या हातावर मेंदी)

नवी दिल्‍ली- टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुरेश रैना आज (3 एप्रिल) बालपणीची मैत्रिण प्रियंका चौधरी हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्‍यात आला आहे. गुरुवारी रात्री प्रियंकाच्या हातावर मेंदी सजली.
मेरठमधील एका हॉटेलमध्ये हा विधी पार पडला. यावेळी जवळपास शंभरपेक्षा जास्त पाहुणे उपस्थित होते. बाउंसरच्या सुरक्षेत प्रियंका स्टेजवर पोहोचली. मेंदी विधीला नातेवाईकांसह नीदरलंडमधून भारतात आलेले काही विशेष पाहुणे उपस्थित होते.
डिनरमध्ये 60 प्रकारचे ललीज व्यंजने
मेंदी विधीला आलेल्या पाहुण्यासाठी शाही डिनर देण्यात आले. 60 प्रकारचे लजीज व्यंजने होते. यात भारतीय, चायनीज आणि मुगलिया डिश होत्या.

दोन्ही कुटुंबांच्या रिती-रिवाजानुसार विधी...
प्रियंकाच्या कुटुंबीयांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील रीती-रिवाजानुसार विधी पूर्ण केला. तसेच सुरेश रैनाच्या कुटुंबीयांनी कश्मीरी परंपरेनुसार विधी पूर्ण केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, नवरीप्रमाणे सजवण्यात आले आहे रैनाचे घर...