आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश रैनाला आता पुनरागमनाची आशा; गांगुलीचा पाठिंबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिलेल्या उपयुक्त सूचना आणि त्याने व्यक्त केलेल्या पाठिंब्यामुळे सुरेश रैनाला एकदिवसीय संघात पुनरागमनाची पुन्हा आशा निर्माण झाली आहे.

मागील 24 एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ एकदाच अर्धशतक केल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यामुळे नंतर त्याला न्यूझीलंडच्या दौर्‍यातून तसेच आशिया चषकातूनही वगळण्यात आले होते. मात्र, टी-20 चषकात त्याला स्थान देण्यात आले असून तेथील कामगिरीच्या बळावर पुन्हा एकदिवसीय संघात स्थान मिळवण्याची त्याला आशा आहे. आता 16 मार्चपासून बांगलादेशात विश्वचषकाला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सुरेश रैनाला भारताकडून चमकदार कामगिरी करताना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी अहे.

उसळत्या चेंडूंवर विशेष सराव
रैनाच्या खेळातील कच्च दुवा म्हणजे उसळते चेंडू. या चेंडूवरच त्याने सरावात विशेष भर दिला आहे. जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा जे तुमच्या पाठीशी उभे राहतात, तेच तुमचे मित्र आणि मार्गदर्शक असतात. असाच अनुभव मला गांगुलीच्या बाबतीत आला. गांगुलीने मला माझ्या पायाच्या हालचाली आणि मानसिकतेवर काम करण्याचा सल्ला दिला आहे. आमची दोघांची खेळण्याची शैली खूपच सारखी असल्याने मला सल्ला देणे गांगुलीलाही खूप सुलभ होते, असेही रैना म्हणाला.