आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Virat Kohali And Anuksha Sharma Love Story

विराट-अनुष्काच्या लव्ह स्टोरीला रेड सिग्नल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून- भारतीय संघाचा विराट कोहली आणि सिनेअभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील ‘गुटरगू’ सध्या चांगलेच रंगात आले आहे. दरम्यान, हे दोघेही सोबत फिरायला गेल्याच्या प्रकरणाची आता या चर्चेला खमंग फोडणी बसली. त्यामुळे या दोघांच्या ‘हम साथ साथ हैं’च्या चर्चेने क्रिकेटच्या विश्वात आता चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ गेल्या काही दिवसांपासून तोंडावर बोट ठेवून विराट-अनुष्काची लव्ह स्टोरी उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. मात्र, हे प्रकरण जरा अति झाल्यामुळे आता बीसीसीआयने विराट कोहली आणि अनुष्काच्या ‘गाठीभेटीं’ना रेड सिग्नल दाखवला आहे. नियमावलीला छेद देऊन अधिकच जवळ आलेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे सुरू असलेले प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीनेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता पावले उचलली आहेत.

राजीव शुक्ला यांची ताकीद : ‘ भारतीय संघातील विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना सोबत राहण्याची कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. त्यामुळे यापुढे या दोघांनाही सोबत राहता येणार नाही,’ अशा शब्दांत बीसीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ताकीद दिली. कोहली आणि अनुष्का यांच्या भेटीसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला शुक्ला यांनी हे उत्तर दिले.

तो अधिकार कुटुंबीयांनाच : ‘भारतीय संघातील खेळाडूंसोबत राहण्याचा अधिकार केवळ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच आहे. मित्रांना केवळ भेटण्याची मुभा आहे. मात्र, त्या खेळाडूसोबत राहण्याची इतर कोणालाही परवानगी नाही. त्यामुळे विराट कोहलीला या प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून कोणत्याही प्रकारची सवलत नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.