भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज आणि आश्वासक चेहरा
विराट कोहली आज 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेट व्यतिरिक्त विराट
आपल्या स्टाईलमुळे, अफेअरमुळे चर्चेत राहिला आहे. विराट कोहलीचे कित्येक अॅक्ट्रेस आणि मॉडेल्ससोबत रिलेशन राहिले आहे. विराटचे अभिनेत्री तमन्ना भटपासून सुरु झालेले अफेअर आता अनुष्कापर्यंत येऊन ठेपले आहे.
जाहिरातीच्या शुटिंगवेळी झाली होती भेट
विराट आणि अनुष्का यांच्या अफेअरची सुरुवात एका जाहिरातीच्या शुटिंगवेळी झाली होती. यासाठी विराटने सालसा नृत्याचे प्रशिक्षणही घेतले होते. जाहीरातीच्या शुटिंगपासून सुरु झालेले प्रेम लवकरच
विवाहबंधनात अडकण्याची संकेत मिळत आहेत.
विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच विवाह बंधनात अडकण्याची शक्यता आहे. विराटच्या कुटुंबीयांनी मुंबईत अनुष्का आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कुटुंबांतर्फे लवकरच लग्नाची तारीख जाहीर केली जाऊ शकते. विराटच्या आई सरोज या काही दिवसांपूर्वीच मुंबईत अनुष्काला भेटल्या होत्या. त्यावेळी विराटचा भाऊही त्यांच्याबरोबर होता.
पुढील स्लाइडवर वाचा, विराट-अनुष्काची संपूर्ण लव्ह स्टोरी ... कोठे भेटले.. कसे प्रेम फुलले.. ते आजतागायत .... सबकुछ..