आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्कासाठी काय पण, जीवही देऊ शकतो -प्रेमवीर विराट कोहली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मी प्रेम करतो, त्या तरुणीसाठी जीवही देऊ शकतो, असे प्रेमवीर आणि टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली म्हणाला आहे. अनुष्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्याने आपली भूमिका मांडली. 'द टेलीग्राफ' ला दिलेल्या मुलाखतीत त्याने अनुष्कासह त्याच्या कुटुंबासंदर्भात विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिलीत.
अनुष्कासोबत असलेल्या नात्याबाबत तो म्हणाला, की मी आणि अनुष्का आमच्या नात्याबाबत जागरुक आहोत. काही लोकांना हे नाते फॅंटसी सारखे वाटते. पण ते सत्यापासून दूर आहेत.
नात्यात कुणी लुडबुड करु नये
अनुष्कासोबत असलेले नाते क्रिकेट करिअरला बाधा आहे का, या प्रश्नावर विराट म्हणाला, की आमचे प्रेम एक सर्वसामान्य नाते आहे. आम्ही निर्णय घेतला आहे, की आम्हाला जे वाटेल तेच करायचे. आमच्या नात्यात कुणी लुडबुड केलेली मला आवडत नाही. आमच्यासाठी दुसऱ्याच्या मताला किंमत नाही. आम्हाला माहित आहे, की विरोधकांना कसे गप्प बसवायचे.
यावेळी त्याने सांगितले, की एका शाम्पूच्या जाहिरातीच्या वेळी मी पहिल्यांदा अनुष्काला भेटलो होतो.
एकमेकांवर आहे विश्वास
एका प्रश्नाला उत्तर देताना विराट म्हणाला, की आम्ही एकमेकांची खुप काळजी घेतो. वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया हरल्यानंतर क्रिकेट रसिकांनी अनुष्काच्या प्रतिमा जाळल्या. ही गोष्ट मला आजही खटकते. असे करायला नको होते.
वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये टीम इंडिया हरल्यावर सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काच्या नात्याची खिल्ली उडवण्यात आली होती. अनुष्का एका पनोती आहे, अशी प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर विराटने एका पत्रकार परिषदेत यासंदर्भात आपली नाराजी व्यक्त केली होती.
पुढील स्लाईडवर बघा, लव्हबर्ड विराट आणि अनुष्काचे फोटो....असे राहतात एकमेकांजवळ...