आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Virat Kolhi Speaks On Anushka Sharma\'s Support After WC Defeat In Semi Finals

\'अनुष्का चीयर करते तेव्हा मी जास्त धावा काढतो\', प्रेमवीर कोहलीची \'विराट\'वाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेदरम्यान मेलबर्नमध्ये सोबत दिसले होते विराट-अनुष्का)

'विश्वचषक- 2015'च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवास क्रिकेट चाहत्यांनी मला आणि अनुष्काला जबाबदार ठरवले. क्रिकेट चाहत्यांकडून मिळालेल्या रिअॅक्शननंतर मी खूप खचलो होतो. परंतु, अनुष्काने मला धीर दिला. संयम राखून खेळावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले होते,' असे टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितले. विराट पहिल्यांच अनुष्कासोबत असलेल्या रिलेशनशिपबद्दल उघडपणे बोलला.

विश्वचषकानंतर विराट आणि अनुष्काला आलेले वाईट अनुभव त्याने या मुलाखतीत शेअर केले. विराटने म्हणाला, 'अनुष्कानेच मला संयम राखण्यास सांगितले. देशातील लोक कोणाविषयी इतका वाईट विचार कसा करू शकतात? परंतु याकडे दूर्लक्ष करून आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्‍याचा सल्ला अनुष्काने दिला आणि हळू हळू मी सावरलो.

सेमी फायनलच्या पराभवानंतर आमचे पोस्टर जाळण्यात आले. अनुष्काच्या डोक्यावर पराभवाला खापर फोडण्यात आले. परंतु, जेव्हा मी ऑस्ट्रेलियाच्या विरोधात कसोटी मालिकेत शानदार चार शतक ठोकले, तेव्हा मात्र कोणीच कसे पुढे आले नाही. तेव्हा अनुष्काला का विजयाचे श्रेय का दिले नाही. अनुष्का तेव्हा ऑस्ट्रेलियात मला चीयर करण्‍यासाठीच आली होती. तिच्यामुळेच कसोटी मालिकेत मी शानदार कामगिरी करू शकलो. अनुष्का मला चीयर करते तेव्हा मी जास्त धावा काढतो, असेही विराटने सांगितले.

सोशल मीडियातून अनुष्का आणि माझ्या पर्सनल लाईफला टार्गेट केले जात आहे. क्रिकेट चाहत्यांनी हे थांबवण्याची गरज आहे. क्रिकेट हा खेळ असून त्यात विजय-पराभव सुरुच असतो, परंतु सेमीफायनलच्या पराभवाचा आणि अनुष्का काही संबंध नाही. अनुष्का माझ्यासह टीम इंडिया ‍चीयर करण्‍यासाठी आली होती. मात्र, या अनुभवात अनुष्का आणि माझ्यातील 'रिलेशनशिप' आणखी घट्ट झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, क्रिकेट चाहत्याच्या रिअॅक्शनवर काय म्हणाला होता विराट कोहली...