आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाचा युवराज सिंगसाठी रॅम्प वॉक, बिग बी, काजोलसह हे सेलेब्स पोहचले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॅम्प वॉक करताना युवराजसह दिपीका पादुकोण.. कधी काळी या दोघांत अफेयर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. - Divya Marathi
रॅम्प वॉक करताना युवराजसह दिपीका पादुकोण.. कधी काळी या दोघांत अफेयर असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
मुंबई- मागील सहा महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या युवराज सिंगने आता फॅशन वर्ल्डमध्ये एंट्री केली आहे. त्याने आपले क्लोदिंग कलेक्शन YWC लाँच केले. यातून होणारी कमाई त्याची एनजीओ ‘YouWeCan’ मध्ये जाईल. ही एनजीओ त्या कॅन्सर पीडितांना मदत करते जे पैशामुळे उपचार घेऊ शकत नाही. शनिवारी रात्री या ब्रॅंडच्या लॉन्चिंगसाठी एक खास फॅशन शो ठेवला गेला. ज्यात स्पोर्ट्स आणि फिल्म जगतातील अनेक बड्या हस्तियांनी रॅम्प वॉक केला. कोण कोण उतरले रॅम्पवर....
- युवराज सिंगच्या क्लोदिंग ब्रॅंड 'YWC' च्या लॉन्चिंग इव्हेंटसाठी एका स्पेशल फॅशन शोमध्ये आयोजन केले होते.
- या इव्हेंटमध्ये युवीला सपोर्ट करण्यासाठी अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, काजोल, नेहा धूपिया, फरहान अख्तर, फराह खानसह अनेक सेलेब्स पोहचले होते.
- युवराजला मदत करण्यासाठी त्याची आई शबनम सिंह आणि मंगेतर हेजल कीच सुद्धा उपस्थित होती. यादरम्यान हेजलने रॅम्प वॉक केला.
- फॅशन शो मध्ये आलेल्या सर्व स्पेशल गेस्ट्सचे स्वागत स्वत: युवराज सिंगने केले. तो अनेक सिता-यासमवेत सेल्फी घेताना दिसला.
- जेव्हा अमिताभ रॅम्वर पोहचले तेव्हा युवीने स्वत: पुढे येऊन त्यांना सोबत घेतले.
- युवीची मम्मी जेव्हा रॅम्वर आली तेव्हा तिने आईच्या पाया पडला. या दरम्यान त्याने आपल्या लग्नाबाबत आणि धोनीबाबत भाष्य केले.
- धोनीबाबत मजेशीर अंदाजात तो म्हणाला की, ‘धोनी मॅचमध्ये बिझी आहे. त्यामुळे तो माझे फोनही घेत नाही.’
- युवराजने मंगेतर हेजल कीचसोबत डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे म्हणाला.
क्रिकेटर्स सुद्धा उतरले रॅम्पवर...
- फॅशन शोदरम्यान अनेक क्रिकेटर्सनी सुद्धा रॅम्प वॉक केला.
- यादरम्यान वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, रोहित शर्मा, ड्वेन ब्रावो, झहीर खान, इशांत शर्मा, मो. कैफ, आशीष नेहरा आणि इरफान पठानने रॅम्प वॉक केला.
- इंडियन हॉकी टीमचा कर्णधार पी आर श्रीजेश, पैलवान सुशील कुमार, माजी फुटबॉल कर्णधार बायचिंग भूतिया, महिला गोल्फर शर्मिला निकोलेट यांनीही हजेरी लावली.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, युवीला सपोर्ट करण्यासाठी कोण-कोणते सेलेब्स पोहचले होते या इव्हेंटमध्ये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...