आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cricketers Be Aleart While Using National Acadamy For Wrong Purposes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्‍ट्रीय अकादमीचा गैरवापर करणा-या क्रिकेटपटूंवर होणार कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) गैरवापर करणा-या क्रिकेटपटूंना वेसण घालण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत कठोर निर्णय घेण्यात आले.


यापुढे अकादमीचा संपूर्ण व विनामूल्य लाभ फक्त बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंनाच घेता येईल. यापुढे जायबंदी झालेल्या खेळाडूवर उपचार करताना तो क्रिकेट खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे का, ही बाब प्राधान्याने लक्षात घेतली जाईल. दुखापतग्रस्त खेळाडू पुनर्वसनानंतर बरा झाल्यानंतरही अकादमीच्या कृपेने बंगळूर येथे राहत असेल तर त्याच्या तेथील वास्तव्यावर गदा येईल.


दुखापत बरी झाल्यानंतर त्या खेळाडूला तत्काळ आपल्या निवासाची व्यवस्था इतरत्र करावी लागेल. काही खेळाडू स्वत:ची आर्थिक कुवत असतानाही अकादमीच्या हॉस्टेलमध्ये अनेक दिवस राहत असल्याचे उघड झाले आहे. अकादमीमध्ये दुखापतींचे पुनर्वसन व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी येणा-या खेळाडूंवर मर्यादा आणण्यात आली आहे.


खेळाडू प्रशिक्षणासाठी दाखल होतात आणि आपापले त्या शहरांमधील व्यवसाय उरकून हॉस्टेलमध्येच राहतात, असे निदर्शनास आल्यानंतर असा कटू निर्णय घ्यावा लागला. क्रिकेटपटू जायबंदी झाला नसेल किंवा पुनर्वसनासाठी बोर्डाच्या फिझिओने त्याला पाचारण केले नसेल, अशा खेळाडूला यापुढे स्वखर्चाने राहावे लागणार आहे.