आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या वडिलांचे बंगळुरुत निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू राहुल द्रविड याचे वडील शरद द्रविड (79) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी सायंकाळी निधन झाले. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार द्रविडचे वडील चार वर्षांपासून आजारी होते. राहुल द्रविडचे ते प्रेरणास्रोत होते. कुंबळेशिवाय कर्नाटक संघटनेच्या इतर पदाधिकार्‍यांनी राहुलच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पित केली.

बंगळुरुमधील इंदिरानगरातील राहत्या घरी शरद द्रविड यांची प्राणज्योत मालवली. राहुल द्रविडचे वडील किसान (जॅम निर्माता कंपनी) कंपनीत नोकरी करत होते.त्यांची पत्नी पुष्पा द्रविड या यूनिवर्सिटी विश्वेश्वरैया कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमध्ये 'आर्किटेक्चर'च्या प्राध्यापिका होत्या.