नवी दिल्ली - आगामी आयसीसी विश्वचषक 2015 स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी ‘सुंदर महिलां’पासून सावध राहावे, असा इशारा न्यूझीलंड पोलिसांनी त्यांच्या खेळाडूंना दिला आहे. विश्वचषकाचे आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.
पोलिस अधिका-यांनी केले सजग
द न्यूझीलंड हेराल्डने प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार,'भ्रष्टाचार आणि सट्टेबाजीपासून मुक्त ठेवण्यासाठी क्रिकेटपटूंनी अनोळखी सुंदर तरुणींपासून दूर राहावे, असा सल्ला पोलिस अधिकारी सँड्रा मँडरसन यांनी दिला.
फिक्सिंगसाठी केले जाते मजबुर
विश्वचषकादरम्यान अब्जावधी रुपयांचा सट्टा लागण्याची शक्यता आहे. यामध्ये सुंदर महिलांचा वापर करुन बुकी खेळाडूंना फसवू शकतात. त्यांच्या मतानुसार ऐकले नाही तर कधी-कधी या महिला ब्लॅकमेलसुध्दा करतात, असे पोलिस अधिका-यांनी सांगितले.
लू विंसेट अडकला होता सट्टेबाजांच्या जाळ्यात
आयसीसी(आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) मॅच फिक्सिंग रोखण्यासाठी प्रयत्नरत आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा लू विसेंट सट्टेबाजांच्या जाळ्यात अडकला होता. त्याने त्याचा गुन्हा स्वत: कबूल केला होता. आयसीसीने कितीही सट्टेबाजांना रोखण्याचा प्रयत्न केले असले तरी मोठ्या प्रमाणार सट्टेबाजीचा प्रयत्न होतच असतो.