आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cristiano Ronaldo Reveals Girlfriend Irina Shayk Keeps 'stealing' His CR7 Boxers

रोनाल्डोने दिली सुपरमॉडल इरिनाला 'सोडचिठ्ठी', आता TV स्‍टारसोबत प्रेमसबंध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्‍डोचे सुपरमॉडल इरिना शायक सोबत ब्रेक अप झाले आहे. माध्‍यमांनी दिलेल्‍या माहितीनुसार रोनाल्‍डो सध्‍या 26 वर्षीय टीव्‍ही स्‍टार लुसिया विलेलोनसोबत रिलेशनशिपमध्‍ये आहे. उल्‍लेखनिय म्‍हणजे रोनाल्‍डो आणि इरिना 2010 पासून रिलेशनशिपमध्‍ये होते.
(फोटो - नवीन गर्लफ्रेंड लुसियासोबत ख्रिस्तियानो रोनाल्‍डो )
टीव्‍ही स्‍टारने सोशल साइटवर पोस्‍ट केले छायाचित्र
टीव्‍ही स्‍टार लुसियाने रोनाल्डोसोबतचा फोटो सोशल साइटवर पोस्‍ट केल्‍याने त्‍यांच्‍या या नात्‍याविषयी पुष्‍टी झाली आहे. या फोटोला 25 हजार लाइक्स आणि 3 हजार कमेंट्स आल्‍या आहेत.
हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली होती इरिना
इरिना शायक आणि रोनाल्‍डो यांनी स्पोर्ट्स मासिकासाठी हॉट फोटोशूट केले होते. तयामुळे दोघेही चांगलेच चर्चेत आले होते. इरिना शायकने 2014 मध्‍ये हॉलीवुड चित्रपटातही पदार्पण केले. 'द रॉक' ड्वेन जॉन्सन सोबत तिने चित्रपटात काम केले.
डिसेंबरमध्‍ये दिसले होते सोबत
रोनाल्डा आणि इरिना शायक डिसेंबर 2014 मध्‍ये सोबत दिसले होते. त्‍यानंतर अद्यापपर्यंत दोघेही कधीच सोबत दिसले नाही. 5 फेब्रुवारी रोजी रोनाल्‍डोचा वाढदिवस होता. त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या पार्टीमध्‍येही इरिना उपस्थित नव्‍हती.
पुढील स्‍लाइडवर पाहा, ख्रिस्तियानो रोनाल्‍डो आणि इरिना शायक यांची निवडक छायाचित्रे...