आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cristiano Ronaldo Succeeded In Champions Football League, Divya Marathi

चॅम्पियन्स फुटबॉल लीग: रोनाल्डोचा गोल; रिअल माद्रिदचा २-१ ने विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोफिया - जबरदस्त फॉर्मात असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोच्या रिअल माद्रिदने चॅम्पियन्स फुटबॉल लीगमध्ये शानदार विजय मिळवला. माद्रिदने रंगतदार लढतीत लुडोर्गोरेट्स राझगार्डचा २-१ अशा फरकाने पराभव केला. सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो (२५ मि.) आणि करिम बेन्झेमा (७७ मि.) यांनी शानदार गोलच्या बळावर माद्रिदने सामना जिंकला.

दहा वेळचा चॅम्पियन्स लीग विजेता रिअल माद्रिदने दमदार सुरुवात केली. मात्र, सहाव्या मिनिटाला गोलरक्षकाने केलेल्या चुकीचा माद्रिदला मोठा फटका बसला. राझगार्डने सहाव्या मिनिटाला माद्रिदविरुद्ध १-० ने आघाडी मिळवली. मार्सेलीन्होने शानदार गोल करून राझगार्डला हे यश मिळवून दिले. मात्र, या संघाचा लढतीतील हा एकमेव गोल ठरला. पिछाडीवर असलेल्या रिअल माद्रिदने १९ मिनिटांनंतर लढतीत मध्यतरांपूर्वी बरोबरी साधली. सामन्याच्या २५ मिनिटाला रोनाल्डोने मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर शानदार गोल केला. यासह माद्रिदला लढतीत बरोबरी साधता आली. दुस-या हाफमध्ये करीम बेन्झेमाने ७७ मिनिटाला गोल करून माद्रिद संघाचा रोमहर्षक विजय निश्चित केला.

वेल्बेकची हॅटट्रिक; आर्सेनल विजयी
डी. वेल्बेकने (२२, ३०, ५२, मि.) गोलची हॅटट्रिक नोंदवून चॅम्पियन्स फुटबॉल लीगमध्ये आर्सेनलला एकतर्फी विजय मिळवून दिला. आर्सेनलने लढतीत गॅलेटसारीचा ४-१ अशा फरकाने पराभव केला. सांचेझने (४१ मि.) संघाच्या विजयात एका गोलचे याेगदान दिले. दुस-या हाफमध्ये पुनरागमन करताना गॅलेटसारीने गोलचे खाते उघडले. मात्र, या संघाचा सामन्यातील हा एकमेव गोल ठरला. बुर्क यिल्माझने ६३ मिनिटाला गॅलेटसारीकडून हा गोल केला होता.