आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cristiano Ronaldo Winner Helps Real Madrid Maintain Lead At Top Of La Liga

रोनाल्डोच्या जादूने रिअल माद्रिद गुणतालिकेत अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद - ला लिगामध्ये रिअल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या 39 व्या गोलच्या बळावर संघाने पुन्हा एकदा विजय संपादन करीत गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली आहे.

मालगाविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात रिअल माद्रिदने 1-0 असा विजय मिळवला. रोनाल्डोने सामन्याच्या 22 व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. मालगाने अखेरच्या सत्रात सामना बरोबरीत आणण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. मात्र, माद्रिदच्या खेळाडूंच्या आक्रमणापुढे ते तग धरू शकले नाही.
अ‍ॅटलेटिकोला पुन्हा पुढे जाण्याची संधी अ‍ॅटलेटिको संघाचा सामना शनिवारी इस्पॅन्योलशी होणार आहे.

या सामन्यात अ‍ॅटलेटिको माद्रिदने विजय मिळवल्यास त्यांना अंकतालिकेत पुन्हा वर जाण्याची संधी मिळू शकते. या सामन्यापूर्वी अंकतालिकेतील रिअल माद्रिद अव्वलस्थान कायम राहणार असून अ‍ॅटलेटिको दुसर्‍या, तर बार्सिलोना तृतीय स्थानावर विराजमान राहतील.

बार्सिलोनाशी रंगणारा सामना महत्त्वाचा
बार्सिलोनाच्या संघाविरुद्ध खेळला जाणारा रिअल माद्रिदचा सामना रंगतदार ठरणार आहे. पुढील आठवड्यात होणार्‍या सामन्यात तीन गुण मिळवणे हे आमचे लक्ष्य राहणार असल्याचे रिअल माद्रिदचा मिडफील्डर झाबी अलोन्सोने सांगितले.

संघाने चांगली कामगिरी केली
आम्हाला सहज विजय मिळाला नसला तरी संघाची कामगिरी चांगली झाली असल्याचे रिअल माद्रिद संघाचे प्रशिक्षक कार्लो अ‍ॅनसेलोट्टी यांनी नमूद केले. मलगाने सामन्यात बरोबरी करण्यासाठी बरीच मेहनत केल्याचेही अ‍ॅनसेलोट्टी म्हणाले.