आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: ...आणि फुटबॉलपटू रोनाल्‍डोला रडू कोसळले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झ्युरीच: रिआल माद्रिद आणि पोतुर्गालकडून खेळणारा ख्रिस्तियानो रोनाल्‍डोला 'बेलन डीओर' हा फुटबॉलमधील अत्‍यंत प्रतिष्‍ठेचा मानला जाणारा जगातील 'सर्वोत्‍तम फुटबॉलपटू' पुरस्‍कार फिफाकडून प्रदान करण्‍यात आला. पुरस्‍कार स्विकारताना रोनाल्‍डो भावनाविवश झाला होता. त्‍याच्‍या डोळयांत आनंदाश्रू तराळले होते.

रोनाल्‍डोने आतापर्यंत दुस-यांदा हा पुरस्‍कार पटकावला आहे. यापूर्वी 2008 मध्‍ये त्‍याला हा पुरस्‍कार मिळाला होता. मात्र त्‍यानंतर बर्सिलोनकडुन खेळणा-या मेस्‍सीने सलग चारवेळा हा पुरस्‍कार जिंकला होता. गेल्‍या वर्षीसुध्‍दा मेस्‍सी 56 गोल करुन दुस-या स्‍थानी तर फ्रान्‍सचा फ्रॅक रिबेरी तिस-या स्थानी राहिला आहे. रोनाल्‍डोच्‍या नावावर 69 गोल असून तो 'उत्‍कृष्‍ठ फुटबॉलपटू' ठरला आहे.

पुरस्‍कारावर बोलताना रोनाल्‍डो म्‍हणाला, की ''या क्षणाचा आनंद व्‍यक्‍त करण्‍यासाठी माझ्याकडे शब्‍द नसून या पुरस्‍काराचे श्रेय माझ्या परिवारला तसेच माझ्या चाहत्‍यांना जाते''.

पुढील स्‍लाइडवर पाहा, रोनाल्‍डोची पुरस्‍कारासह भावूक छायाचित्रे...