आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍पॉट फिक्सिंग: बीसीसीआयने राज कुंद्राला केले निलंबित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आयपीएलमधील राजस्‍थान रॉयल्‍स संघाचा सहमालक आणि अभिनेत्री शिल्‍पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला निलंबित करण्‍यात आले आहे. सोमवारी बीसीसीआयच्‍या कार्यकारी समितीच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.

जोपर्यंत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत कुंद्रा यांना निलंबित करण्‍याचे बैठकीत निश्चित करण्‍यात आले. बीसीसीआय आपल्‍या स्‍तरावर या प्रकरणाची चौकशी करणार आहे. जर यामध्‍ये कुंद्रा दोषी आढळले तर राजस्‍थान रॉयल्‍सला आयपीएलमधून निलंबित केले जाऊ शकते.

कुंद्राचे वकील माजिद मेमन यांनी बीसीसीआयचा निर्णय चुकीचा असल्‍याचे म्‍हटले आहे. बीसीसीआयने कोणत्‍या आधारावर कुंद्रांच्‍या विरोधात कारवाई केली असल्‍याचा प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित केला आहे. ते मंडळाच्‍या निर्णयाला आव्‍हान देणार आहेत.

कुंद्रावर आपल्‍याच टीमवर सट्टा लावल्‍याचा आरोप आहे. कुंद्राने मागील तीन वर्षांत सट्टयावर सुमारे एक कोटी रूपये लावले होते, असे म्‍हटले जाते. दिल्‍ली पोलिसांच्‍या म्‍हणण्‍यानुसार शिल्‍पा शेट्टीनेही एक लाख रूपयांचा सट्टा खेळला होता. तिने हा सट्टा कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍स यांच्‍यादरम्‍यान खेळण्‍यात आलेल्‍या सामन्‍यावर लावला होता.