आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रैनाच्या 'वादळी' खेळीने चेन्‍नई सुपर किंग्‍ज ठरले 'चॅम्पियन्‍सचे चॅम्पियन'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबरदस्त फार्मममध्ये असलेल्या सुरेश रैना (नाबाद 109) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (23) यांच्या अभेद्य अर्धशतकी भागीदारीच्या बळावर चेन्नई संघाने आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाइटराइडर्सला पराभूत केले. आणि ख-या अर्थाने चॅम्पियंस लीगचा किताबी सामना जिंकून 'चॅम्पियन्सचा चॅम्पियन' असा गौरव मिळविला. चेन्नईने नऊ चेंडू आणि आठ विकेटने केकेआरला पराभूत केले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना गौतम गंभीरच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाने 6 गडी गमावून 180 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.
फलंदाजीत रैना, गोलंदाजांची दैना
अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जच्या सुरेश रैनाने धावांचा पाऊस पाडला. झंझावाती फलंदाजी करताना त्याने केकेआरच्या गोलंदाजांची दैना केली. त्याने 62 चेंडूंचा सामना करताना सहा चौकार आणि आठ षटकारांची आतषबाजी करून नाबाद 109 धावांची खेळी केली. यासह त्याने शतकही झळकावले. त्यानंतर त्याने धोनीसोबत अभेद्य 58 धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला.

चेन्नईवर 15 कोटींचा वर्षाव

चॅम्पियन्स लीग विजेत्या चेन्नई सुपरकिंग्जवर 15 कोटीं रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. या वेळी ट्रॉफी देऊन या संघाचा गौरव करण्यात आला. तसेच उपविजेता ठरलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला 7.80 कोटी रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्या दरम्यानची रोमांचक छायाचित्रे..