आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वचषकापूर्वी पाकिस्‍तानला धक्‍का, मोहम्मद हाफीज दूखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्‍तानाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्‍याच्‍या ऐवजी राहत अलीला संघात स्‍थान मिळाले आहे.
गेल्या आठवड्यात नेपीयर येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळल्‍या गेलेल्‍या सामन्‍यात हाफीजच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्याला तीन आठवडे विश्रांती आवश्‍यक असल्‍याने तो पाकिस्‍तानात परतला आहे. असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने (पीसीबी) सांगितले.
प्रतिबंधानंतर केले होते पुनरागमन
आयसीसीने गोलंदाजीतील त्‍याच्‍या अॅक्शनमुळे त्‍याच्‍यावर बंदी घातली होती. परंतु, प्रतिबंधानंतर हाफीजने जोरदार पुनरागमन केले होते.
एकदिवसीय करिअर
आपल्‍या 155 एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये हाफीजने 452 धावा केल्‍या. त्‍यामध्‍ये 9 शतके आ‍णि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.