आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CWG 2014: Arpinder Singh Wins Bronze In Men's Triple Jump

CWG : तिहेरी उडीत अर्पिंदरला कांस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - भारताचा युवा खेळाडू अर्पिंदर सिंगने दमदार प्रदर्शन करताना अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला पदक मिळवून दिले. अर्पिंदरसिंगने पुरुषांच्या तिहेरी उडीत शनिवारी रात्री उशिरा कांस्यपदक जिंकले. भारताकडून अ‍ॅथलेटिक्समध्ये विकास गौडा आणि सीमा पुनिया यांनी पदके जिंकली.

जून महिन्यात अर्पिंदरसिंगने 17.17 मीटरच्या कामगिरी केली होती. त्याच्या या पराक्रमामुळे त्याच्याकडून राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची आशा केली जात होती. अर्पिंदरसिंगने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली. हरपिंदरने 16.63 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीने कांस्य जिंकले.

21 वर्षीय अर्पिंदरने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ही उडी मारली. यानंतर त्याला या कामगिरीत सुधारणा करता आली नाही. पहिल्या प्रयत्नानंतर त्याने 16.46 मी., 16.31 मी., 16.09 मी. अशा तीन उड्या मारल्या. अखेरच्या दोन उड्या फाऊल ठरल्या. द. आफ्रिकेचा खोस्टो मोकेना याने 17.2 मी. सह सुवर्णपदक, तर दिल्ली राष्ट्रकुलचा विजेता नायजेरियाच्या तोसिन ओकेने रौप्यपदक मिळवले.

पदकामुळे आनंदी..
या पदकामुळे मी आनंदी आहे. कारण वातावरण प्रतिकूल होते. शिवाय माझे प्रशिक्षकही येथे नव्हते. यामुळे मी सर्वोत्तम कामगिरी बजावू शकलो नाही, तरीही पदक जिंकल्याचा आनंद आहेच. - अर्पिंदरसिंग.