आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CWG Gold Medalist Yogeshwar Dutt Latest News In Marathi

PICS: पराठ्यांचा चाहता आहे कुस्‍तीगीर योगेश्‍वर दत्‍त, जाणून घ्‍या त्‍याच्‍या खास गोष्‍टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - सरावादरम्‍यान योगेश्‍वर दत्‍त आणि सुशील कुमार)
पानीपत - ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त याने २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात गुरुवारी सुवर्णमय कामगिरी केली. तो स्‍वभावाने अत्‍यंत विनम्र असून नित्‍यनियमाने सराव करतो शिवाय जेवनही प्रमाणात घेतो.
लंडन 2012 च्‍या ऑलिंम्पिकमध्‍ये एका मुलाखतीदरम्‍यान योगेश्‍वर दत्‍त म्‍हणाला होता की, मला जेवायला काहीही आवडते पण पराठा असेल तर मग खुपच चांगले.
मैत्रीसाठी काय पण
शरीराने अत्‍यंत कठोर दिसणारा स्‍वभावाने फार मृदु आहे. आपल्‍या अत्‍यंत जवळचे मित्र सुशील आणि बजरंगसाठी वाट्टेल ते करायला तो तयार असतो. तर आपल्‍या यशामध्‍ये तो मित्रांचा आणि परिवाराचा महत्‍वाचा वाटा असल्‍याचे सांगतो.
वयाच्‍या आठव्‍या वर्षांपासून कुस्‍ती
बलराज पहिलवानाकडून प्रेरणा घेऊन कुस्‍तीत वयाच्‍या आठव्‍या वर्षांपासून योगेश्‍वर दत्‍त कुस्‍तीमध्‍ये उतरला. योगेश्‍वरने हरिणामधील प्रशिक्षक रामफाल कडून डावपेच शिकले. आजही तो आपल्‍या गावाशी संबंध ठेवतो.
योगेश्‍वरची उपलब्‍धी
आपल्‍या करिअरमध्‍ये योगेश्‍वरने 2003 च्‍या राष्‍ट्रकुलमध्‍ये सुवर्णपदकाची कमाई केली. 15 व्‍या आशियाई खेळांमध्‍ये कास्‍य पदकाची कमाई केली. 2006 मध्‍ये 60 किलो वजनी गटात पाचव्‍या स्‍थानी राहिला. लंडन 2012 च्‍या ऑलिंपिकमध्‍ये कास्‍य पदक पटाकावले. तर यावर्षीच्‍या राष्‍ट्रकुल स्‍पर्धेमध्‍ये सुवर्णपदकाची कमाई केली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, योगेश्‍वर कुमारची काही खास छायाचित्रे..